एरंडोल, कासोदा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

Spread the love

एरंडोल | प्रतिनिधी: – एरंडोल व कासोदा येथे अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

रा.ती.काबरे विद्यालय

शहरातील रा.ती.काबरे विद्यालयाच्या प्रांगणावर सुमारे २००० विद्यार्थी,एरंडोल न्यायालयाच्या न्यायाधीश बी.ए.तळेकर,वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य,कर्मचारी, भाजपा एरंडोल विखरण रिंगणगाव मंडळाचे अध्यक्ष योगेश महाजन,माजी नगरसेवक जगदिश ठाकूर, संदिप पाटील, ॲड.मधुकर महाजन,ॲड.आकाश महाजन,भाजपचे पदाधिकारी,रा.ती.काबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल.

शहरातील गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते, ब. वि.विसपुते सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य दिलीप पांडे,साहेबराव देवरे,जगदिश मोरे,विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक व्यवस्थापन समितीचे सदस्य हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य सुनील ठाकरे, उपप्राचार्या ज्योती वडगावकर यांनी केले.सुत्रसंचलन रत्ना पटवारी रोहित सपकाळे यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विद्यालय

शहरातील प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी इंगळे,बी. के.पुष्पा दीदी,सविता दीदी,छाया दीदी यांनी उपस्थित योग करणाऱ्या समोर आपले बहुमोल विचार मांडले.

क. न.मंत्री शाळा कासोदा

क. न.मंत्री शाळा कासोदा येथे योगासन, प्राणायाम शिबीर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरात 252 विद्यार्थी , विद्यार्थिनी , शिक्षक व शिक्षकइतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या ठिकाणी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल मंत्री, मुख्याध्यापक श्री संजय बोरसे, एरंडोल येथील योग गुरु श्रीराहुल साळुंखे,योगशिक्षक श्री. रुपेश अग्रवाल , इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्यद्यपिका उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत सत्काराने झाली. त्यानंतर ठीक ७.३० वाजता योग वर्गाला विश्व प्रार्थनेने सुरुवात झाली. श्री . साळुंखे सर यांनी सगळ्यांना योग व प्राणायामामुळे स्मरणशक्ती व आरोग्यत प्रचंड सुधारणा होते असे सांगितले. विद्यार्थ्यांकडून योग प्राणायाम करून घेतला व त्यांच्या घरातील वृद्ध आजी आजोबांकडून नियमित योग करून घेण्याचे वचन घेतले . सदरील कार्यक्रम योगगुरु श्री ईश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. ९.00 वाजता शांतीपाठ ने योग वर्गाचे समापन झाले. अध्यक्ष व मुख्यद्यापक यांनी शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग व उपस्थित त्यांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता केली

मुख्य संपादक संजय चौधरी