पाचोऱ्यात शिक्षकाची मधल्या सुट्टीत शाळेतच गळफास लावून संपविली जीवन यात्रा,कारण समजू शकले नाही.

Spread the love

पाचोरा :- शाळेतली मधली सुट्टी झाली होती. त्यामुळे सर्व विद्यार्थी आपल्या वर्गातून बाहेर खाली शाळेच्या तळमजल्यावर जेवणासाठी आले होते. जेवणाची सुट्टी संपल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात जाण्यासाठी निघाले.वर्गात येताच महाले सर त्यांना लटकलेले दिसले. यामुळे मुलं भयभीत होऊन आरडाओरड करायला लागले. आरडाओरडचा आवाज ऐकून विद्यार्थ्यांची आणखी गर्दी वर्गात आली. तसेच इतर शिक्षण देखील तिथे दाखल झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात एका शाळेत ही घटना घडली.रवींद्र भारत महाले असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून शिक्षकाने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण वर्गात शिक्षकाचा मृतदेह पाहून विद्यार्थ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा स्थित सुपडू भादु विद्या मंदिर शाळेत ही घटना घडली आहे. रवींद्र महाले हे पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील रहिवासी असून गत काही वर्षांपासून ते पाचोरा शहरातीलच गिरा पंपिंग रोडवर वास्तव्यास होते. ते पाचोरा येथील सुपडू भादु शाळेत कार्यरत होते. त्यांनी आज बुधवारी सकाळी 10.30 वा. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील एका वर्गात गळफास लावून आत्महत्या केली.

यावेळी विद्यार्थी मधल्या सुट्टीसाठी वर्गाबाहेर गेले होते. वर्गात कुणीही नव्हते. ही संधी साधून रवींद्र महाले यांनी आत्महत्या केली. सुट्टीनंतर विद्यार्थी वर्गात परतले असता त्यांना शिक्षक गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. हे पाहून त्यांनी एकच आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर ही घटना समोर आली.शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ही घटना शाळा सुरू असताना घडल्यामुळे विद्यार्थी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत. पण तूर्त मानसिक तणावामुळे रवींद्र महाले यांनी आत्महत्या केली असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी