पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी

Spread the love

पारोळा:- सुमठाणे ता .पारोळा शिवारात एका 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आणि मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही घटना ता. २५ बुधवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी महिला व खून करणारा संशयित आरोपी उंदीरखेडा ता पारोळा येथील असल्याचे निष्पन्न झाले सदरची कारवाईत आरोपीलां पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

कशी झाली घटना

तालुक्यातील सुमठाणे शिवारात ता .25 रोजी सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण बकऱ्या चारून घरी परत येत होते. त्यावेळी त्यांना एका महिलेचा खून करून मृतदेह गोणीत टाकून तिला फेकून दिल्याचे आढळून आले. तसेच तिचे हातपाय बांधलेले अवस्थेत होते. ही घटना दोन दिवसाआधी घडली असावी, असा अंदाज आहे.

कसा लागला शोध

याप्रकरणी पारोळा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या जळगाव यांची पथके नेमली होती या पथकाने सखोल चौकशी करत मोबाईलच्या आधारावर महिलेचा शोध लावला खून झालेल्या महिलेचे नाव शोभाबाई रघुनाथ कोळी वय अंदाजे वय 48 वर्ष, व्यवसाय घरकाम, रा उंदीरखेडा, ता पारोळा असे आहे पतीसोबत उंदीरखेडा येथे राहते त्यांचा मुलगा अंकलेश्वर या ठिकाणी राहतो त्याची तब्येत बरी नसल्याने महिलेचे पती रघुनाथ कोळी यांना मुलाकडे पाठविले होते त्यामुळे कदाचित महिला घरी एकटीच असल्याने आरोपीने याचा डाव साधत महिलेचा खून केला असल्याचा संशय आहे येणाऱ्या काळात हा खून कशामुळे व कुठल्या कारणामुळे झाला याचा उलगडा पोलिसांकडून होईल,यात अजून किती जणांचा समावेश आहे हे कळेल, सदर खून करणाऱ्या संशयित आरोपीस पारोळा पोलिसांनी ता .28 रोजी सायंकाळी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव संयुक्तपणे काम करत होते.
मात्र पारोळा पोलिसांनी सदर महिलेची ओळख पटवत आरोपीचा
शोध घेतला.

48 तासातच अनोळखी महिलेची ओळख
सुमठाणे येथे महिलेचा खून झाला

ही घटना सर्वांना थक्क करणारी होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सानप, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन, उपनिरीक्षक अमरसिंह वसावे, हवालदार सुनील हटकर डॉक्टर शरद पाटील अभिजीत पाटील महेश पाटील संदीप सातपुते अनिल राठोड आशिष गायकवाड मिथुन पाटील विजय पाटील, चतरसिंग मेहर महिला कर्मचारी सविता पाटील
या संपूर्ण टीमने घटनेच्या संदर्भात सहकार्य केले.

मुख्य संपादक संजय चौधरी