पाचोरा :- शहरातील बसस्थानक परिसरात घडलेल्या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असुन मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्याचा जागीच ठार केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की पाचोरा बसस्थानक परिसरात भर दिवसा गोळी करीत एका २६ वर्षीय तरुणाचा मुत्यु झाल्याची घटना घडली असता सदर घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून तात्काळ पसार झाला या गोळीबाराची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पाचोरा पोलिसांनी परिसराची पाहणी करत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला,असता तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, बसस्थानक परिसरातील तसेच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी ठाण मांडून-
पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की सदर फरार आरोपीचां शोध घेण्या कामी विशेष पोलिस पथक नेमण्यात आले असुन तात्काळ आरोपींचा शोध घेऊन आरोपी अटक करण्यात येईल अशी माहिती स्थानिक पत्रकारांना दिली आहे.
घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र,पोलिस विविध शक्यतांचा विचार करून सर्व अंगांनी तपास करत आहेत. या थरारक हत्येने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.