उन्हाळ्यात ताक ठरते अमृतच…

Spread the love

दह्याचिये अंगी निघे ताकलोणी
दोहोसी समान लेखू नये,

असे काही तरी संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले असले, तरी ताकाला कोणी कमी समजू नये. ताक अत्यंत उपयुक्‍त आहे. शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. नियमित ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते.

महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहिल्यास शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.

ताकात विटॅमिन इ 12, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी तत्त्वे असतात. ही तत्त्वे शरीरासाठी फारच फायद्याची असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक घेतल्याने असे त्रास कमी होतात.

ताक नियमित पिण्याचे फायदे…

1.ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

2.वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

3.दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

4.ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात

5.ताकात गूळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

6.थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

7.रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

8.ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. त्याने तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल.

.

टीम झुंजार