जामनेर (प्रतिनीधी) :- तालुक्यांतील सर्वांना परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर येथील निवासस्थानी साकीनाका(मुंबई) पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळपासून दुपार पर्यंत सर्च ऑपरेशन राबविण्यात येऊन घराची झाडाझडती घेण्यात आली तर पहुर पोलीसांनी त्यांच्या पहूर येथील व्यापारी संकुलाची पाहणी केली साकीनाका(मुंबई) पोलीस स्टेशनला प्रफुल्ल लोढा यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यांना व त्यांच्या वाहन चालकाला अटक करण्यात आली असल्याचे ही समजते.
नामदार गिरीश महाजन यांच्या वर २०१९ विधानसभा निवडणुकीत गंभीर आरोप करून चर्चेत आलेले लोढा यांनी २०२४ विधानसभा निवडणुकीत भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा व त्याच अनुषंगाने जामनेर व पहूर येथील सर्च ऑपरेशन मुळे तालुक्यात एकच खळबळ माजली असून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे तर पॉक्सो गुन्हा तसेच संपत्तीचा वाद यातून या कार्यवाया झाल्या असल्याचे समजते तर या प्रकरणात कोणत्याच प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसल्याचे निकटवर्तीय यांच्या चर्चेतून ऐकण्यास मिळत आहे.