एरंडोल :- शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची ,आषाढ वृक्ष संवर्धन वारी ,मोठ्या आनंदाने ,उत्साहात एरंडोल शहरात संपन्न झाली. या आषाढी वारीची सुरुवात रा ती काबरे विद्यालयाच्या मैदानावरून झाली प्रथम पालखीतील पांडुरंग परमात्म्याच्या प्रतिमेचे पूजन, संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी काबरे, सचिव राजीवजी मणियार, शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर नितीन राठी, सभासद अनिल बिर्ला, धीरज काबरे सतीश परदेशी, परेश बिर्ला शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन ,व्हाईस प्रिन्सिपल सरिता पाटील यांच्या हस्ते पूजन करून दिंडी सोहळ्याचे प्रस्थान सर्वांच्या उपस्थितीत झाले . याप्रसंगी शाळेतील मित्रा चव्हाण व भाग्यश्री महाजन या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पांडुरंग परमात्मा व हर्षाली पाटील व हर्षिता पाटील या विद्यार्थिनी माता रुक्माई च्या वेशभूषेत सहभागी होते. तसेच शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर नृत्य सादर करून एरंडोल नगरवासियांना मंत्रमुग्ध केले. व विठू नामाच्या गजराने सर्व बालगोपाल या वारकरी संप्रदायाच्या वारसा जपत या दिंडी सोहळ्याचा आनंद घेत नाचत विठू नामाचे नाम घेत मोठ्या आनंदाने या दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला .या दिंडी सोहळ्यात शाळेचे प्रिन्सिपल ,व्हॉइस प्रिन्सिपल ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री शरदचंद्रजी काबरे यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना उपासाचा चिवडा वाटण्यात आला व शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आषाढी एकादशीनिमित्त फराळ राजगिरा लाडू वाटप करण्यात आले.