जळगाव :- शहराच्या मध्यवर्ती भागातील हॉटेल रॉयल पॅलेस, जे पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ स्थित आहे, येथे सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकून १९ लाख ९७ हजार रुपयांची रोकड आणि १३ मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत.यावेळी ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात वाढत्या जुगाराला आळा घालण्यासा पोलीस प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी आणि अपरपोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार, उपविभागीय पोलीस अथिकारी संदीप गावीत यांच्यालेखी आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने हॉटेल रॉयल पँलेस येथे छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत 19 लाख 97 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि 13 मोबाईल हँड्सेटसह 8 जुगारींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुरूवारी 10 जुलैला मध्यरात्रीनंतर हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदाना जवळील रूम नंबर 209 मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी टीम तयार करू हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये छापा टाकला.
11 जुलैला मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस गाठून खात्री केली. हॉटेलमधील रुम नंबर 209 ही मदन लुल्ला यांच्या नावावर आरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने छापा टाकला असता, तिथे 8 इसम जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून रोख 19 लाख 97 हजार रुपये आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे 13 मोबाईल हँडसेट असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुगार खेळणाऱ्या ‘या’ आठ जणांना केली अटक
पप्पु सोहम जैन रा. बळीराम पेठ, रुखील ( वय- ३२)रा.जळगाव , भावेश पंजोमल मंधान (वय-३७) रा.रामाराम नगर,सिंधी कॉलनी, मदन सुंदरदास लुल्ला (वय४२) रा. गणपती नगर, सुनील करलाल वालेचा (वय-४०) रा. सिंधी कॉलनी, अमित राजकूमार वालेचा (वय-४५) रा. गणेश नगर, विशाल दयानंद नाथानी (वय४८) रा. गायत्री नगर, आणि कमलेश कैलाशजी सोनी(वय-३६) रा. वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड जळगाव यांना अटक करण्यात आली आहे.