मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.

Spread the love

जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील मोयखेडा दिगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांचा पुरता फज्जा उडाला आहे.काही घरकुलांवर तर पुन्हा पुन्हा अनुदान लाटल्याचा प्रकार होत असल्याचे समजते.प्रतिनीधीने प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली असता.एका ठिकाणी घरकुलाचा लाभ घेऊन अनुदान काढले आहे.परंतु त्या ठिकाणी आजच्या घडीला अक्षरक्ष: कुळाचे घर आहे. मग त्या जागेवर बांधकाम केलेलं घर गेलं कुठे हा प्रश्न आहे.तर काही ठिकाणी अगोदरच झालेल्या जुन्या घरकुलांवर नवीन घरकुलांचे अनुदान काढले असल्याचे दिसून येते.

एकंदरीतच मोयखेडा दिगर या गावी घरकुल योजनेचा पुरता फज्जा झाल्याचे दिसते.त्यावर अजून एक विशेष म्हणजे जामनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी झालेल्या प्रकारबाबत चौकशीसाठी त्रिसदस्य समिती नेमली परंतु समिती मधील सदस्यसुद्धा चौकशी करण्याकडे कानाडोळा करत आहे.यामागचे कारण काय हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.मोयखेडा दिगर प्रमाणे तालुक्यातील इतर ग्रामपंचायती मध्ये सुद्धा असा प्रकार होऊ शकत असल्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

मुख्य संपादक संजय चौधरी