एरंडोल बसस्थानकातील विकासकामांचा भूमिपुजनाने,प्रवाशांना सोयी -सुविधा मिळण्यास येईल सुलभता- आमदार मा.अमोलदादा पाटील

Spread the love

एरंडोल :– एरंडोल शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असून हे शहर अंजनी नदीच्या काठावर वसले आहे. याठिकाणी शिक्षण सुविधा, आरोग्य, दळणवळण यांसह सर्वच सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने एरंडोल तालुक्यातील ६५ हून अधिक खेडे गावांतील नागरिक दैनंदिन आपल्या कामकाजासाठी येत असतात. तसेच एरंडोल शहर हे जळगांव, धुळे, धरणगांव, भडगांव, पाचोरा, म्हसावद याठिकाणी जाण्यासाठी मध्यस्थीचे ठिकाण असून येथील बसस्थानकात दैनंदिन प्रवाशांची वर्दळ सुरूच असते. अशात दैनंदिन प्रवास करणारे शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रवासी यांना या बसस्थानक आवारात रस्ता, पाणी, बैठक व्यवस्था, स्वच्छता यांसह आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय हि होत आहे. यांची मा.आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी पाठपुरावा व दखल घेत एरंडोल बसस्थानकाचा कायापालटासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला.

एरंडोल बसस्थानक व आगाराचे आधुनिकीकरण व वाहनतळाचे काँक्रीटीकरण करणे या कामासाठी मंजूर ०४.०० कोटी रुपयांचा विकासकामाचे आज भूमिपूजन आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, पंचायत समिती मा.सभापती गबाआण्णा पाटील, दादाजी पाटील, तालुकासंघटक संभाआबा पाटील, धरणगांव बाजार समितीचे संचालक देविदास चौधरी सर, किरणदादा पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, मा.उपनगराध्यक्ष अतुल महाजन, आदर्श शेतकरी समाधान पाटील यांचेसह विविध गावांचा ग्रामपंचायत, विकासो, इतर स्थानिक स्वराज्य, शिवसेना, युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, राज्य परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.

एरंडोल बसस्थानक हे मध्यस्थीचे ठिकाण असल्याने येथे दैनंदिन प्रवाशांची संख्या हि मोठी आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने शासकीय कार्यालये, शिक्षण, आरोग्य यांसह दैनंदिन दळणवळण यासाठी ग्रामीण भागातून नागरिक, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी हे बसचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. या बसस्थानकात नेहमीच वर्दळ हि सुरूच असते. येथे येणाऱ्या प्रवाशांना बसस्थानक परिसरात कुठल्याही सोय-सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय हि होत आहे. पावसाळ्यात आगारातील परिसर हा संपूर्ण चिखलात असतो, अशात या बसस्थानकात वावरणे खूप जिक्रीचे होत आहे. यांची दखल मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी घेऊन शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा केला व तब्बल ४ कोटी रुपये या बसस्थानकाचा कायापालटासाठी मंजूर करून आणले. आज आपण या कामाचे भूमिपूजन केले, येत्या काळात दैनंदिन प्रवाशांची सोयी-सुविधांअभावी होत असलेली गैरसोय थांबावी यासाठी, या विकासकामांतून यात सुलभता येणार आहे. आपण पाहत आहेत मा.आबासाहेबांनी सुरु केलेली विकासगंगा हि त्यापेक्षा अधिक वेगाने कशी पुढे नेता येतील यासाठी मी देखील प्रयत्न करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच आपण पद्मालय साठवण तलावाचा १०७२ कोटी रुपयांचा द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी मिळवली, यासह मतदारसंघातील मुलभूत सुविधा, पायाभूत सुविधा, शाश्वत विकास यासह मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी व विकासाचे व्हिजन मतदारसंघात रुजविण्यासाठी कार्य करत आहे. आज याकामाचे आपण भूमिपुजन केले, हे काम उच्च प्रतीचे व गुणवत्तापूर्ण करून घेण्यासाठी या एरंडोल आगाराचे प्रमुख निलेश बेंडकुळे यांनी अधिकाधिक लक्ष द्यावे व कंत्राटदरांनी देखील येथील प्रवासी व कर्मचाऱ्यांची एकही तक्रारी न येता उत्तम काम करण्याचा सूचना यावेळी आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी दिल्या.

हि होणार कामे –

एरंडोल बसस्थानक व आगार इमारतीचे नुतनीकरण करणे, एरंडोल बसस्थानक व आगारात वाहनतळाचे काँक्रीटीकरण करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रवाशी प्रतिक्षालयामध्ये अतिरिक्त नविन ग्रेनाईटचे बेंचेस बसविणे, स्वतंत्रपणे महिलांसाठी हिरकणी कक्ष, बसस्थानक व आगार इमारतीचे संपुर्ण रंगकाम करणे यांसह इत्यादी कामांचा समावेश आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी