एरंडोल | प्रतिनिधी – एरंडोल येथील नागरिकांनी वाढीव वीज बिलबाबत जन आक्रोश मोर्चा काढून निवेदन सदर केले.सदर मोर्चा दि.२१ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता म्हसावद नाका ते महावितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
निवेदनात शहरातील रहिवाशांच्या घरगुती वीजबिलात अचानकपणे काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या वाढीव वीज बिलाचे कोणतेही कारण माहित नसून वीज वापरत कुठलेही वाढ नसताना बिलात होणारी वाढ अन्याय कारक असल्याचे म्हटले आहे.
वेळेवर वीज बिल भरत असून सुद्धा नागरिकांवर वाढीव वीज बिलाचा मोठा आर्थिक भार पडत असल्याचे देखील म्हटले असून अवाजवी वाढीव आलेल्या वीज बिलांची तपासणी करुन ती रक्कम वाजवी दराने कमी करावी,संबंधित मीटर यांची फेर तपासणी करावी,ग्राहकांसाठी सुलभ बिल दुरुस्ती प्रक्रिया सुरू करण्यात यावी,आमच्या समस्यांचे निवारण करून याबाबतीत आम्हाला तत्काळ लेखी उत्तर द्यावे असे म्हटले आहे.
याप्रसंगी ॲड.आकाश महाजन,ॲड.प्रेमराज पाटील,ॲड.दिनकर पाटील, प्रा.आर.एस.पाटील,प्रवीण महाजन,ॲड.अजिंक्य काळे, ॲड.नयन आरखे, प्रेमचंद पाटील, गजानन पाटील,बी. के.धूत, किरण महाजन, विजय गायकवाड,ॲड. दीपमाला खैरनार,धनंजय खैरनार, किरण महाजन, महेंद्र महाजन,एरंडोल संघर्ष समिती सभासद तसेच इतर शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.