जामनेर(प्रतिनिधी):- पंचायत समितीच्या माजी सभापती सुनंदा प्रल्हाद पाटील यांचे पती प्रल्हाद पाटील(वय ६२) यांनी जामनेर शहरातील सोनबर्डी परिसरात झाडाला फाशी घेवून आत्महत्या केल्याची घडली.
सविस्तर वृत्त असे कि प्रल्हाद एकनाथ पाटील हे पेशाने शिक्षक होते.त्यानी २०२१मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती त्याच काळात त्यांच्या पत्नी सुनंदा पाटील जामनेर पंचायत समितीच्या सभापती झाल्या होत्या.प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या काय कारणामुळे केली असेल याचे कारण मात्र अजून समोर आलेले नाही. तर घटने दरम्यान त्यांच्या खिशात चिट्ठी आढळून आल्याचे समजते. मात्र चिठ्ठी नेमकी कसली हे स्पष्ट झालेलं नाही.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सुन,तीन नातवंड असा परीवार आहे.