एरंडोल :- एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे जेवण करुन घरात झोपलेली असतांना रात्री अचानक साप चावल्याने हेमांगी संजय शिंपी (१२) हिचा मृत्यू झाल्याची घटना दि. २६ जुलै २०२५ रोजी रात्री १ वा. घडली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमांगी हि २६ रोजी रात्री जेवण करुन झोपलेली असतांना तिला रात्री झोपेतच उजव्या हाताला साप चावल्याने हेमांगी हिस उपचारासाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डाॅक्टरांनी मृत घोषित केले. हेमांगीचे वडील संजय मधुकर शिंपी यांनी कासोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक अकिल खलिल मुजावर हे करीत आहेत. हेमांगी हिचे शवविच्छेदन करुन दि. २७ रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.