शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना त्वरित व पारदर्शकपणे मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध:तहसीलदार आगळे

Spread the love


जामनेर( प्रतिनिधी):- ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना त्वरित व पारदर्शकपणे मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानंतर्गत पहूर येथे आयोजित ग्रामसभेत बोलताना सांगितले.
दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार आगळे यांनी मौजे पहूर पेठ ग्रामपंचायत येथे आयोजित ग्रामसभेला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
या ग्रामसभेत त्यांनी सेवा पंधरवडा तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना त्वरित व पारदर्शकपणे मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
तहसीलदार आगळे यांनी ग्रामसभेतूनच नागरिकांना सेवा पंधरवड्यातील कार्यक्रमांविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये महिला व बालविकास, आरोग्य, पोषण, महसूल, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांच्या योजनांचा समावेश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, विभागीय अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेतूनच सेवा पंधरवड्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रशासन व ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागामुळे जामनेर तालुक्यातील सर्वांना शासनाच्या सेवा व योजना अधिक प्रभावीपणे मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मुख्य संपादक संजय चौधरी