होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.

Spread the love

प्रतिनिधी – एरंडोल
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील दिशादर्शक फलकांवरील “एरंडोल” आणि “पद्मालय” या गावांच्या नावांतील चुकीची नोंद दुरुस्त करण्यात आली असून आता नवीन फलकांवर “एरंडोल” व “पद्मालय” अशी अचूक नावे दर्शविण्यात आली आहेत.
या संदर्भात स्थानिक रहिवासी अॅड.आकाश महाजन यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मुख्य कार्यालय दिल्ली तसेच जळगाव युनिटकडे लेखी निवेदन सादर केले होते.

संबंधित निवेदनात महामार्गावर झळकणाऱ्या जुन्या फलकांवर “एरंडोळ” व “पद्माळय” अशी चुकीची नावे असल्याचे नमूद करण्यात आले होते.
या त्रुटीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत होता तसेच ऐतिहासिकदृष्ट्या ओळख असलेल्या “एरंडोल” आणि “पद्मालय” गावांच्या योग्य ओळखीला बाधा पोहोचत होती. या बाबत NHAI विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत फलकांवरील नावे दुरुस्त करून नवीन दिशादर्शक फलक उभारले आहेत.
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून “आमच्या गावांची खरी ओळख आता योग्यरीत्या दिसू लागली आहे” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी