जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील शहापूर येथील सुरेश रामदास डोंगरे यांच्या घरात अज्ञात चोरट्यानीं रोख रक्कम,सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल असा ऐवजाची चोरी केली होती.यात जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी व त्यांच्या पथकातील कर्मचारी पो.कॉ.सचिन महाजन,विशाल लाड,योगेश पाटील,अमोल पाटील,पांचाळ,चंद्रशेखर नाईक,यांनी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव बापू रोहम यांच्या मार्गदर्शनात चोराच्या चोरी करण्याची पद्धत व इतर गोपनीय तांत्रिक बाबींचा अभ्यास करत.आरोपीला शोधून ताब्यात घेऊन सदर गुन्हा लागलीच उघडकीस आणला.या घटनेत आरोपी अक्रम शहा(रा. बिस्मिल्लाह नगर, जामनेर) याच्या कडून ७४५०० एकूण रक्कमेचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पुढील तपास पो.उ.नि.किशोर पाटील हे करत आहे.






