पारोळा – एरंडोल नगरपरिषद भाजपा-शिवसेना युतीची पत्रकार परिषदेत घोषणा….
पारोळा – नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुक – २०२५ ला काल १० नोव्हेंबर पासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. त्याअनुषंगाने आज पारोळा येथील आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, चाळीसगांव विधानसभेचे आमदार मा.मंगेशदादा चव्हाण व एरंडोल विधानसभेचे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.

याप्रसंगी भाजपा नेते ॲड.किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोजभाऊ पाटील, मा.नगराध्यक्ष गोविंदआबा शिरोळे, भाजपा पदाधिकारी रेखाताई चौधरी, ॲड.कृतिका आफ्रे, जिल्हा दुध संघाचे संचालक परागदादा मोरे, मा.नगरसेवक रोहनदादा मोरे यांचेसह भाजपा-शिवसेना युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, इच्छुक उमेदवार, पत्रकार उपस्थित होते.

होऊ घातलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारोळा व एरंडोल शहरात शिवसेना-भाजपा युतीची घोषणा करण्यात आली. तसेच एरंडोल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपा कडुन डॉ.एन.डी.ठाकुर तर पारोळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेनेकडुन चंद्रकांतदादा पाटील यांना अधिकृत उमेदवार म्हणुन जाहीर करण्यात आले. तसेच नगरसेवक पदाची बोलणी देखील सकारात्मक रित्या झाली असुन ते देखील लवकरच स्पष्ट होणार असल्याचे यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण व आमदार अमोलदादा पाटील यांनी सांगितले.







