पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल

Spread the love

भडगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील पिंपरखेड येथे दि.१४ रोजी वाल्मीक सजंय ह्याळींगे वय-२७ वर्ष याचा मृतदेह केटीवेअर बंधाऱ्या च्या पाण्यात आढळुन आला होता त्यानंतर दि.१६ रोजी नारायण रामदास ह्याळींगे वय -५२ वर्ष यांचाही मृतदेह त्याच केटीवेअर बंधाऱ्याच्या पाण्यात आढळून आला होता.नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने या दोन्ही घटने बाबत भडगांव पोलिसांनी तपास चक्र फिरवित एका आरोपीला अटक केली असुन भडगांव पोलिसात एका आरोपी विरोधात खुनाचा गुन्ह्या सह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भडगांव तालुक्यातील पिंपरखेड घटने प्रकरणी दि.११ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री व दि.१४ नोव्हेंबर च्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान सरकारी दवाखान्या समोरच्या केटीवेअर बंधाऱ्याच्या साचलेल्या पाण्यात सार्वजनिक जागी पहिल्या दिवशी एक तर दोन दिवसाच्या अंतरावर दुसरा मुत्यदेह आढळून आला होता पहिल्या घटनेत भडगांव पोलिसात अक्समात मृत्युची नोंद दाखल करण्यात आली होती त्या घटनेचा भडगांव पोलिस तपास करीत असतांनाच दुसरा मृत्यदेह त्याच केटीवेअरच्या पाण्यात आढळून आल्याने घातपाताचा सशंय व्यक्त करत मयताचा पुतण्या दिपक देविदास ह्याळींगे यांच्या फिर्यादी वरून दि.१६ रोजी भडगांव पोलिसात फिर्याद दिल्याने आज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत भडगांव पोलिसांनी तपास चक्र फिरवित मयत चुलत काका नारायण रामदास ह्याळींगे यांचे खुनाच्या तपासात पोलिसांना आरोपी- विनोद उर्फ (भैय्या)प्रकाश पाटील हा निष्पन्न झालेला आहे त्यांच प्रमाणे अकस्मात मृत्यु रंजी नं ७९/२०२५ मधील मयत वाल्मीक संजय ह्याळींगे यांचा देखील त्या ठिकाणी घातपात करून मृत्यु घडवुन आणलेला आहे.

पोलिसांच्या माहिती नुसार दोन्ही घटनेतील आरोपी एकच असल्याने आरोपी- विनोद उर्फ (भैय्या)प्रकाश पाटील याच्या विरोधात गुरंन.४१२/ २०२५ कलम १०३(१) सह अनसुचीत जाती जमाती कायदा कलम ३(२) (V) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने बाबत चा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कुमार ठाकुरवाड हे करीत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी