एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

Spread the love


प्रतिनिधी – एरंडोल येथील विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी जयंती उत्सव समितीतर्फे दोन दिवस भरघोस कार्यक्रम घेण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात जयंतीच्या पुर्वसंध्येला भिम गीतांच्या गीतांवर चिमुकल्यांनी नृत्य सादर केले. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी सामूहिक बुद्ध वंदना म्हटली.यानंतर आमदार अमोल पाटील,नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर, भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अॅड.किशोर काळकर, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाल पाटील, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे गटनेते प्रा. मनोज पाटील, उपनगराध्यक्षा सुनीता माळी, नगरसेविका छाया दाभाडे,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,आरती महाजन, डॉ. राजेंद्र चौधरी, उद्योजक समाधान पाटील, अॅड. ओम त्रिवेदी, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, डॉ. के. ए. बोहरी,डॉ. फरहाज बोहरी,यशयंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,डॉ.संग्राम पाटील,नगरसेवक अनिल महाजन,अमोल तंबोली, मयूर महाजन, राजेंद्र महाजन, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा,जगदीश पाटील,निवृत्त तहसीलदार अरुण माळी, युवा सेनेचे माजी जिल्हा समन्वयक अतुल महाजन, डॉ. फरहाज बोहरी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. ईश्वर बिहाडे, माजी नगरसेवक रुपेश माळी,प्रमोद महाजन,निवृत्त कृषी अधिकारी सुधाकर पाटील, गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, बाळासाहेब पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रा.नरेंद्र गायकवाड यांनी सूत्रसंचलन केले.आभार जयंती उत्सव समिती अध्यक्ष लखन बनसोडे यांनी मानले.
यांच्यासह सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर उत्सव समितीतर्फे शहरातून भीमसैनिकांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. रॅलीत सहभागी युवकांच्या दुचाकींवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले निळे ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास समितीतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी डॉ.बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या मुळे आज महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसून आघाडीवर असल्याचा महिला सक्षमीकरणाचा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.नितीन बोरसे व सहकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मिरवणुकीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.मिरवणुकीत भीम बालकांचा रोड शो आकर्षक होता.सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते.महिलांची संख्या लक्षणीय होती व महिला देखील उत्साहाने नृत्य करीत होत्या.
जयंती कार्यक्रमाच्या आयोजन कामी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पदाधिकारी,सल्लागार समिती,पंचशील मित्र मंडळ,सम्राट मित्र मंडळ,रमाबाई आंबेडकर मित्र मंडळ,ब्लू बॉईज,राजे संभाजी गृप यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक संजय चौधरी