पारोळा :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व संसदरत्न, युवानेते, कल्याण लोकसभेचे खासदार मा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आगामी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम, २०२६ (SIR) व मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमणूक संदर्भात एरंडोल विधानसभा मतदारसंघ शिवसेना मेळावा व महत्वपूर्ण आढावा बैठक आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा शहरातील विजया लॉन्स येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्वप्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला, हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत वंदन करण्यात आले.
यासमयी पारोळा नगरपरिषदेचे अपक्ष उमेदवार नजीरखान हमीदखान बेलदार, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष ॲड.अहमद सय्यद, एरंडोल उबाठा शिवसेनेचे तालुकसंघटक अमोल भोई, तरवाडे ता.पारोळा येथील भगवान आनंदा महाजन, रामदास लक्ष्मण महाजन, ज्ञानेश्वर गुमाण पाटील, राजेंद्र पितांबर महाजन, ईश्वर पांडुरंग महाजन, धनराज तोयाराम महाजन, सुभाष देवाजी महाजन, छोटू हेमराज महाराज, तापीराम झगा चौधरी, पिंटू शालिक चौधरी, भिका उत्तम महाजन, हरचंद आनंदा महाजन, गणेश दौलत पाटील यांनी आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे यावेळी मा.अमोलदादांनी सत्कार करत शिवसेनेत स्वागत केले.
यासमयी खडके येथील जगदीशदादा पाटील यांची जिल्हा समन्वयकपदी, एरंडोल येथील अभिजीत पाटील यांची उपजिल्हासमन्वयक, पारोळा नगरपरिषदेचे नगरसेवक मनिषभाऊ पाटील यांची उपजिल्हाप्रमुखपदी, एरंडोल येथील जावेदभाऊ मुजावर यांची अपलसंख्यांक आघाडी उपजिल्हाप्रमुखपदी, एरंडोल येथील ॲड.अहमद सैय्यद यांची अल्पसंख्यांक आघाडी तालुकाप्रमुखपदी, एरंडोल येथील अतुल महाजन यांची OBC सेलच्या तालुकाप्रमुखपदी, एरंडोल येथील अनिलभाऊ महाजन यांची OBC सेलच्या शहरप्रमुखपदी, एरंडोल येथील कुणालभाऊ महाजन यांची शिवसेना तालुकासमन्वयकपदी, एरंडोल येथील नगरसेवक अल्ताप खान यांची अल्पसंख्यांक आघाडी शहरप्रमुखपदी, एरंडोल येथील मोहन सैंदाने यांची युवासेना उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभलेल्या जळगांव येथील नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष मा.जयदीप पाटील यांनी मतदार यादी म्हणजे निवडणुकीचा पाया आहे. हा पाया मजबूत असेल तर विजयाची इमारत आपोआप उभी राहते. त्यामुळे प्रत्येक मतदार तपासून, प्रत्येक बूथ मजबूत करण्याचा निर्धार करा. BLA यांनी BLO यांच्या सोबत सतत संपर्क ठेवावा आणि बोगस मतदारांना हद्दपार करत हक्काचे मतदार सुरक्षित करण्यासह विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम, २०२६ (SIR) व मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमणूक संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील यांनी या मेळाव्याला अध्यक्षीय भाषणात संबोधित करतांना सांगितले की, आजचा हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपण केवळ एक बैठक घेत नाही आहोत, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एक भक्कम पाया रचत आहोत. मतदार यादी ही निवडणुकीची कणा आहे, आणि तो कणा मजबूत ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. आज देशात आणि राज्यात लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी अचूक मतदार नोंदणी अत्यंत गरजेची आहे. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ (SIR) हा केवळ एक शासकीय उपक्रम नसून, तो लोकशाही सुदृढ करण्याचा एक मोठा संकल्प आहे. या संकल्पाच्या यशासाठी आपली भूमिका अत्यंत निर्णायक आहे.
सर्व बी.एल.ए. बांधवांना आवाहन करू इच्छितो की, प्रत्येक घरापर्यंत पोहोचा, प्रत्येक मतदाराची अचूक माहिती तपासा, नवीन पात्र मतदारांची नोंदणी करा आणि बोगस व अपात्र नावे वगळण्यावर भर द्या आपण जर ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर कोणतीही निवडणूक आपल्यासाठी कठीण राहणार नाही. कारण जिंकण्याची सुरुवात मतदार यादीपासूनच होते.
आज अनेक ठिकाणी असे दिसून येते की, पात्र नागरिक मतदार यादीतून वंचित राहतात आणि काही ठिकाणी बोगस नावेही दिसतात. ही स्थिती बदलण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. “एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही बोगस मतदार यादीत राहू नये” हा आपला निर्धार असला पाहिजे.
तसेच, बी.एल.ए. आणि बी.एल.ओ. यांच्यात सतत समन्वय राहणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारी यंत्रणा आणि आपले कार्यकर्ते यांचा योग्य संवाद असेल, तर मतदार नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल.
आपण केवळ राजकारण करत नाही, तर समाजकारण देखील करत आहोत. लोकशाहीची खरी ताकद ही सामान्य मतदारामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्याचा विश्वास संपादन करणे, हीच खरी शिवसेनेची ताकद आहे.
आज अनेक कार्यकर्त्यांनी इतर पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला, ही बाब आपल्या कार्यपद्धतीवरील विश्वास दर्शवते. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि खात्री देतो की, त्यांना योग्य सन्मान व संधी दिली जाईल.
आपण सर्वांनी एकजुटीने काम केल्यास एरंडोल विधानसभा मतदारसंघात आपण निश्चितच मोठे यश मिळवू शकतो. त्यासाठी आजपासूनच प्रत्येक बूथ मजबूत करण्याचे काम हाती घ्या.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोजभाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख ॲड.सतिषराजे पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष तथा संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, जिजाबरावबापू पाटील, पोपटआण्णा चव्हाण, पंडीतबापू पाटील, जि.प.मा.कृषी सभापती डॉ.दिनकर पाटील, मा.जि.प.सदस्य दिनकरआबा पाटील, रोहिदास पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, देवगांव सरपंच समीरदादा पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्ञानेश्वर कंखरे, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, मधुकरआबा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील, कमलेश पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष दयारामआण्णा पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलूदादा पाटील, एरंडोल शहरप्रमुख बबलूदादा चौधरी, अतुल मराठे, पारोळा शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, जिल्हा बँकेचे मा.संचालक डॉ.सतिष देवकर, धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, पारोळा शेतकी संघाचे मा.अध्यक्ष विजुआबा पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, पंचायत समितीचे मा.सभापती अरुणआबा पाटील, गबाजीआण्णा पाटील, धरणगांव बाजार समितीचे संचालक देविदास चौधरी सर, किरण पाटील, मा.नगराध्यक्ष विठ्ठलबाबा आंधळे, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखारामनाना चौधरी, शेतकी संघाचे मा.संचालक राजेंद्र पाटील, नगरसेविका कल्पनाताई पाटील, सत्यभामाताई पाटील, मा.उपनगराध्यक्ष अतुल महाजन, उपनगराध्यक्ष रूपेशभाऊ महाजन, नगरसेवक मयूर महाजन, आनंद दाभाडे, अमोल तंबोली, गोपाल गुजर, कृष्णा ओतारी, डॉ.नरेंद्र ठाकूर, अभिजीत पाटील, अनिल महाजन, मा.नगरसेवक चिंतामण पाटील, जावेद मुजावर, जेष्ठ शिवसैनिक जगदीशदादा पाटील, रामचंद्रआबा पाटील, पारोळा नगरपरिषदेचे उपगटनेते तथा नगरसेवक पंकज मराठे, नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे, विवेक पाटील, दिपक अनुष्ठान, भूषण टिपरे, इमरान शेख यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि बी.एल.ए. मोठ्या संख्येने उपस्थित होते.






