करमाड बु विकासोवर शिवसेनेचा भगवा…
१३ पैकी १३ जागांवर सेनेचा बिनविरोध विजय

Spread the love

पारोळा – तालुक्यातील करमाड बु विविध कार्यकारी सोसायटीची निवणडुक २५ एप्रिल रोजी पार पडली. या निवडणुकीत १३ जागेसाठी मतदान प्रक्रीया घेण्यात आली. या निवडणुकीत सेनेने दाखल केलेल्या १३ अर्जांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी आय.ए.शेख यांनी १३ च्या १३ जागा बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित केले.

या विजयाने करमाड बु. विकासोवर शिवसेनेने १३ पैकी १३ जागांवर बिनविरोध विजय मिळवत भगवा फडकविला आहे. इतर मागासवर्गीय – दिलीप अर्जुन पाटील, महिला राखीव – सुभद्राबाई हिरामण पाटील, अ.जाती व अ.जमाती – भिल आनंदा नामदेव, सर्वसाधारण – प्रल्हाद आनंदा पाटील, वाणी पिंगळे दिपक मधुकर, चैत्राम परभत पाटील, दिपक संभाजी पाटील, नंदु त्र्यंबक पाटील, मासुम तुराब पटेल, अर्जुन भगवान पाटील, भिकन बाजीराव पाटील अशी विजयी उमेदवारांची नावे आहे.

या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा देत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच हि निवडणुक सचिव दिलबर झिंगा पाटील यांनी योग्यरित्या हाताळली. याप्रसंगी शामराव रामराव पाटील, आधार लक्ष्मण पाटील, अनिल हिरामण पाटील, विलास विनायक पाटील, विमलबाई हिलाल पाटील, बापु नामदेव मोरे, समाधान पाटील यांचेसह आदी उपस्थित होते.

टीम झुंजार