झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
जेऊरवाडी : ( ता. करमाळा)करमाळा तालुक्याचे नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यास प्रोत्साहन देणारे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या प्रेरणेने संपूर्ण करमाळा तालुक्यात जागतिक कीर्तीचे शोध आणि त्यांचे संशोधक शास्त्रज्ञ यांची जयंती साजरी करण्यात येत आहे
त्याचाच एक भाग म्हणून करमाळा तालुक्यातील जेऊर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊरवाडी येथे जागतिक कीर्तीचे थोर शास्त्रज्ञ मार्कोनी यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या बद्दल आणि त्यांनी केलेल्या शोधाबद्दल आत्मविश्वास वाढावा यासाठी मनातील सुप्त इच्छा शाळेचे मुख्याध्यापक किसन कांबळे यांनी विचारल्या.
इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी कार्तिकी आप्पा निमगिरे हिने मोबाईल टावर तयार करून दाखवला तर विचार करून मी ही नवीन शोध लावणार असा आत्मविश्वास विद्यार्थी सिद्धार्थ श्रावण काळेल याने आपल्या मनोगता मध्यें सांगितले. हा कार्यक्रम उत्कंठावर्धकपणे पुर्ण करण्यात आला…