लोणार प्रतीनिधि /उध्दव आटोळे :- राज्याची सुधारलेली घडी मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात पूर्ण विस्कळीत झालेली आहे, भारनियमन जाहीर केले आहे हे भारनियमन टाळता येणार नाही असे राज्याचे मंत्री सांगत आहे.सत्तेच्या मस्तीत असलेल्या या सरकारच्या कार्यकाळात कोळसा संपत चालला असल्याचे सांगण्यात येत आहे वास्तविक पाहता वेळीच नियोजन करून कोळसा आरक्षित करणे आवश्यक होते परंतु सरकारच्या काळात सर्व नियोजन कोलमडूले कोलमडले असून सत्तेच्या मस्तीत असलेल्या सरकारच्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने 24 एप्रिल संध्याकाळी 7.00आंदोलन करण्यात आले वीज वितरणाची, वीजनिर्मितीची एकूण परिस्थिती अतिशय चिंताजनक झालेली आहे महाभकास सरकारच्या विरोधात भाजप मैदानात उतरले असून विजेचे वाढलेल्या दर,शेतकऱ्याचे कापलेले कनेक्शन,आता सुरू झालेले लोड शेडींग याविरोधात 24 एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य कंदील आंदोलन करण्यात आले.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेली चर्चा निष्फळ ठरली असून राज्यात भारनियमन अटळ आहे अशी घोषणा ऊर्जामंत्री यांनी केली आहे बैठकीनंतर केली त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री देखील यावर काही तोडगा काढू शकत नाही स्पष्ट झाले. आपल्या नाकर्तेपणाचे खापर हे केंद्र सरकार फोडत आहे मात्र आज देशभरात इतर राज्यात मुबलक वीज उपलब्ध आहे मागील पाच वर्षात भाजपच्या काळात भारनियमन पूर्णतः बंद होते परंतु या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज हे संकट महाराष्ट्रावर आले आहे.हे राज्य सरकार आल्यापासून सर्व व्यवस्था कोलमडली असून मुख्यमंत्री व मंत्री यांना फक्त आपली सत्ता टिकविण्यासाठी व सत्तेची मलाई खाण्यासाठी एकत्र आले आहे.सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना विद्युत रोहित्रे अंतरास चे पैसे भरून घेत आहे व नादुरुस्त रोहित्रे यंत्र देण्यात आल्यामुळे ते वारंवार जात आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत, शेतकऱ्यांना शेतातल्या उभ्या पिकावर नागर फिरवण्याची वेळ सरकारमुळे आली आहे शेतकऱ्यांना शेतात पाण्याची व्यवस्था असून सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आपले पिके जळताना पहात आहेत अशी अत्यंत वाईट अवस्था असून आसमानी संकटातून शेतकरी सुटला आहे परंतु हे सरकार सुलतानी संकट उभे करत आहे,अशा सर्व शेतकरी बांधवांनी हितासाठी भारतीय जनता पार्टी यांनी कंदील आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले.
लोणार तालुका व शहराच्या वतीने लोडसेडिंगच्या निषेधार्थ मेनबती व कंदील आंदोलन महाभकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा मैदानात वाढलेले विजेचे दर व बळजबरिने कापन्यात येणारे शेतकर्याचे विज कनेक्शन आणी आता सुरु झालेले इमरजेंसी लोडसेडिंग यांच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या विरोधात कंदील व मेनबती आंदोलन करण्यात आले तर यावेळी भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी,जेष्ठनेते भगवानराव सानप,ता उपाध्यक्ष सुबोध संचेती जेष्ठनेते विजय मापारी,
भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरुशे, युवा मोर्चा जिल्हा सचिव उद्धव आटोळे,अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष शेख जावेद,ता.सरचिटनिस प्रकाश नागरे,शहर उपाध्यक्ष राम मापारी,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अजिम चौधरी,पंढरी नामदेव मापारी व सोबत कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते.