झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल:- महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री मा.ना.श्री.बाळासाहेबजी थोरात साहेब यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छाभेट दिली.
याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती था जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील यांनी शाल श्रीफळ व बुके देऊन तर सौ.मृणाल पाटील यांनी मा.मंत्री महोदयांना औक्षण करून सत्कार करत स्वागत केले.
यासमयी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदिप पवार, मा.खा.उल्हासदादा पाटील, मा.उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मंगेशआण्णा तांबे, बाजार समिती मा.संचालक मधुकरआबा पाटील, प्रा.बी.एन.पाटील सर, भैय्यासाहेब पाटील, लोकनियुक्त सरपंच विकास बोरसे, विलास वाघ यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.