जळगाव जिल्हा प्रतिनिधी । प्रवीण चौधरी
जळगाव :- दि. 24/04/2022 रोजी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानं करून जळगाव मनापाचा नाकर्तेपणाचा निषेध केला होता. सदर आंदोलन महाराष्ट्रभर प्रसारित झाले मात्र जळगाव मनपाला काहीही फरक पडलेला नाही.निर्लज्ज पणाचा कळस असे सदर घटनेला म्हणता येईल कारण अजूनही आहे त्या स्थितीत वेस्ट मटेरियल पडलेले आहे .
आज दि.27/04/2022 रोजी जळगाव शहराचे मा.महापौर जयश्रीताई महाजन यांना समक्ष भेटून पुन्हा निवेदन देण्यात आले. संपूर्ण वृत्त महापौरांना सांगितले गेले तसेच जर 2 दिवसात तक्रारीच निराकारण न केल्यास पुन्हा निर्णायक आंदोलन करू असे आप महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर व मीडिया प्रमुख योगेश भोई यांनी इशारा दिला.
गेल्या तीन महिन्या पासून जळगाव आम आदमी पार्टी रस्त्या संदर्भात अस्वछेते विषयी तसे गटारी संदर्भात अनेक वेळा निवेदन दिले व तक्रारी केल्या पण अधिकारी फिरवाफिरवी सतत करत आहे. सिविल हॉस्पिटल जवळील पांडे डेअरी चौकातील काम अतिशय मन्द गतीने चालू आहे या बाबत लेखी निवेदन तसेच जळगावातील कॉलनी. नगरातील. आजारी रस्ते कमीत कमी चालण्या लायक बनवा सदंभात देखील निवेदन दिले आहे
मात्र जळगाव मनापाची कामाची बदली रिकामीच आहे. आम्ही वारंवार तक्रारी देऊन सुद्धा काम होत नाही तर सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारीच काय होत असेल. यावेळी जळगाव करांना निवेदित करित आहोत की आपल्याही असायचं तक्रारी असतील तर आप कार्यालयाल संपर्क करण्याचे आव्हान आप महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर. व मीडिया प्रमुख योगेश भोई यांनी दिले. यावेळी उपास्थित, दुर्गेश निंबाळकर. हेमराज सोनावणे, भूषण कपडणीस, आदी उपस्थित होते