जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम.

Spread the love

Background for a hot summer or heat wave, orange sky with with bright sun and thermometer

जळगाव :- जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून या लाटेमुळे काल बुधवारी दिवसाचे तापमान ४३.४ अंशांवर तर रात्रीचे तापमानही प्रथमच २६.७ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी पातळीवर गेले आहे. त्यामुळे आता रात्रीचा गारवाही हरवल्याची स्थिती आहे. दरम्यान, उष्णतेची ही लाट अजून ३० एप्रिलपर्यंत कायम राहून तापमान ४५ पर्यंत जाईल. म्हणजेच एप्रिलची अखेर जळगावकरांना ‘ताप’दायक ठरेल.

यंदा १६ मार्चपासून जिल्ह्याच्या कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली. यानंतर ६ रोजी जिल्ह्यात ४४ अंश एवढे सर्वोच्च तापमान नोंदवले गेले. या दिवशी किमान तापमान २५ अंश होते. यानंतर गेल्या आठवड्यात अंशतः ढगाळ वातावरणामुळे पारा काहीसा घसरून ४० अंशावर आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा तापमानाचा पारा वाढून ४४ अंशावर गेला आहे. जिल्ह्यात केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीही उष्ण वारे वाहत असल्याने किमान तापमान सरासरी ३ ते ४ अंशांनी वाढल

जिल्ह्यात मार्चपासून चढ्या तापमानाने पोळणाऱ्या जिल्ह्यासाठी एप्रिलदेखील मे हीटची अनुभूती देणारा ठरला. कारण, एप्रिलमध्ये यापूर्वी उष्णतेच्या दोन लाटांचा सामना करावा लागला. यानंतर महिन्याच्या शेवटी पुन्हा तिसऱ्या लाटेचा इशारा आहे. यादरम्यान कमाल तापमान ४४ ते ४५ अंश, तर किमान तापमान २४ ते २७ अंश असेल. उष्णतेचा प्रकोप पाहता घराबाहेर पडताना उष्माघातापासून बचावाची काळजी घ्यावी.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान असे?

  • वेळ – अंश
    १२ वाजेला – ४२ अंश
    १ वाजेला- ४३ अंशापुढे
    २ वाजेला – ४३ अंश
    ३ वाजेला – ४३ अंशापुढे
    ४ वाजेला – ४३ अंश
    ५ वाजेला – ४३ अंश
    ६ वाजेला – ४० अंश
    ७ वाजेला – ३७ अंश
    आणि रात्री ८ वाजेला ३६ अंशावर स्थिरावणार.
टीम झुंजार