बुलढाणा : येथून एक धक्कादायक घटना समोर आला आहे. तो म्हणजे लग्नाच्या दिवशी नवरदेवाकडचे डीजेच्या तालावर वरातीत नाचण्यात मग्न होते. तिकडे नवरी मुलगी आणि तिच्या घरचे नवरदेवाची वाट पाहून कंटाळले होते. पण नवरदेवही लवकर येईना आणि वरातही सरकेना.लग्नाची वेळ ४.०० वााजेची रात्रीचे ८.०० वाजले तरी नवरदेव मंडपात आला नाही
शेवटी नवरी इतकी कंटाळली की तिने थेट नवराच बदलला. नवरदेव नाचतच राहिला आणि इकडे नवरी दुसऱ्याच्याच गळ्यात हार टाकून मोकळी झाली. ही घटना मलकापूरमधील पांगरा गावात 24 एप्रिल रोजी घडली.
जेव्हा मंडपदारी वरात आली तेव्हा नवरदेवासह वऱ्हाडीमंडळी तो नजारा पाहून चक्रावले. नवरीने दुसऱ्याच मुलासोबत लग्न केलं म्हटल्यावर नवरदेव काय गप बसणारे ? नवरदेवानं पण २४ तासात दुसरी मुलगी शोधली आणि लग्नाचा बार उडवला.
हा प्रसंग ऐकायला मजेशीर वाटत असला तरी सध्या ग्रामीण असो किंवा शहर लग्नाबाबत फार गंभिरता राहिली नाही का? असाच प्रश्न पडतोय.