मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा चव्वेचाळीसावा सामना मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. मुंबई इंडिअन्सने ५ गडी आणि ४ चेंडू राखून जिंकला. मुंबई इंडिअन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलरने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ५ चौकार आणि ४ षटकार यांच्या सहाय्याने ५२ चेंडूंत ६७ धावा काढल्या. त्याला ह्रतिक शौकीनने बाद केले. रविचंद्रन अश्विनला २१ धावांवर रिले मेरेडिथने बाद केले. डेरील मिशेलला १७ धावांवर डॅनियल सॅम्सने बाद केले. कर्णधार संजू सॅमसनला १६ धावांवर कुमार कार्तिकेयाने बाद केले. देवदत्त पडीक्कलला १५ धावांवर ह्रतिक शौकीनने बाद केले. राजस्थान रॉयल्स २०व्या षटकाच्या अखेरीस १५८/६ धावा जमा करू शकले. रिले मेरेडिथने २४/२, ह्रतिक शौकीनने ४७/२, कुमार कार्तिकेयाने १९/१, डॅनियल सॅम्सने ३२/१ यांनी गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडिअन्सकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ५ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ३९ चेंडूंत ५१ धावा काढल्या. त्याला यझुवेंद्र चहलने बाद केले. तिलक वर्माने १ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ३० चेंडूंत ३५ धावा काढल्या. त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. ईशान किशनने ४ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने १८ चेंडूंत २६ धावा काढल्या. त्याला ट्रेण्ट बोल्टने बाद केले. टीम डेव्हिडने २ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ९ चेंडूंत बिनबाद २० धावा काढल्या. सामन्यातला पहिलाच चेंडू खेळत असलेल्या डॅनियल सॅम्सने कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेगला उत्तुंग षटकार मारून मुंबई इंडिअन्सच्या नावावर पहिला विजय नोंदवला. सलग ८ पराभवांनतर मुंबई इंडिअन्सला विजयाची चव चाखता आली. १९.२ षटकांनंतर मुंबई इंडिअन्सने १६१/५ अशी विजयी धावसंख्या नोंदवली.
सूर्यकुमार यादवला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने ५१ धावा काढल्या होत्या.
उद्या डबल धमाका होणार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. लखनौ हा सामना जिंकून दुसर्या स्थानावर झेप घेण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पुण्याच्या. एम. सी. ए. स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चेन्नईचा संघ हैदराबादला पराभूत करण्याच्या मनःस्थितीत आहे. तर उद्याचा रविवार क्रिकेट्र रसिकांसाठी मोठी पर्वणी आहे.