लोणार प्रतीनीधी /उध्दव आटोळे :-लोणार शहरातील गायमुख धार कोरोना पासून नगरिकांना स्नान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना नंतर सर्व प्रतिबंधात्मक नियम शिथिल केल्यानंतर ही लोणारच्या धारेवर स्नान करण्यासाठी सर्वसामान्य भविकांना परवानगी न देण्यात आल्याने मि लोणारकर टीम च्या वतीने पुरातत्व विभागास धारेवर स्नान करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती ती न दिल्यास १ में रोजी शांततेने धारेखाली सामूहिक स्नानः करण्यात येणार होते मात्र स्थानिक पोलिस स्टेशन ला दिनांक २९एप्रिल २०२२ रोजी नागपुर येथील पुरातत्व विभागाचे अधिकारी सचिन कौशिक यांनी पत्र व्यवहार करून धारेवर आता भारतीय पुरातत्व स्मारके व अवशेष अधिनियम १९५८ व संशोधित २०१० नुसार राष्ट्रीय संरंक्षित स्मारकां च्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सामूहिक करवाई ला जसे की आंघोळ करणे, कपड़े धुने याला पूर्णतः बंधन घालन्यात आले आहे.
धारेवर आंघोळ केल्यास किंवा कपड़े धुतल्यास सरोवरत जाणारे पानी प्रदूषण करेल त्यामुळे धारेवर कोणत्याही प्रकारच्या आंघोळीस प्रतिबंध घाळण्यात आले आहे. तसे केल्यास त्या व्यक्ति विरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सचिन कौशिक यांच्या या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की धारेवर स्नान तसेच कपड़े धोतांना साबनाचा वापर केल्यामुळे सरोवरातील वैशिष्ट्य पूर्ण पाण्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने धारेवर स्नान तसेच कपड़े धुन्यावर बंदी घालन्या साठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात २००९ साली ४५४९ क्रमांकाची याचिका दाखल करण्यात आली आहे. गायमुख मंदिर हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नागपूर सर्कल, नागपूर द्वारे संरक्षित आणि देखरेख केलेले मध्यवर्ती संरक्षित स्मारक आहे.लोणार येथील गायमुख मंदिरात आंघोळ करणे, कपडे धुणे यांसारखे उपक्रम केल्याने लोणार विवर प्रदूषित होईल कारण गायमुखातुन प्रदूषित पाणी थेट लोणारच्या विवरात जाते. बेकायदेशीर कृत्यांपासून प्रतिबंधित करण्यासाठी पोलीस दलाची नियुक्ती करावी आणि या कार्यालयाच्या सूचनेनुसार लोणार येथील गायमुख मंदिरात अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणार्यांवर एफआयआर दाखल करा.असे सख्त निर्देश सचिन कौशिक यांनी लोणार पोलिसांना दिले आहे.