योगिता वानखेडे यांना समाजभूषण पुरस्कार…

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी रावेर

रावेर :- तालुक्यातील विवरे खुर्द येथील सर्व सामान्य कुटुंबातील पण साहसी,करारी बाणा, समाजांचे ऋण फेडण्यासाठी नेहमीच धडपडणारी सच्ची समाजसेविका योगिता रामदास वानखेडे विवरे खुर्द गावातून त्यांनी आरोग्य विभागात आशा वर्कर म्हणून कामाची सुरुवात केली,गोर-गरीब,मोल मजुरी करणाऱ्या महिलांना एकत्रित करून त्यांच्या साठी बचत गटाची सुरवात केली,

ह्यांना प्रथमच विवरे खुर्द ग्रामपंचायत सदस्यपदी समस्त गावकऱ्यांनी शुभाशिर्वाद देऊन निवडून आल्या. त्या नंतर त्यांनी आपली समाजसेवेची कार्याची गती वाढवून समाजातील विविध स्तरांतील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.शासनाच्या अनेक योजना राबविल्या.याचे फलश्रुती म्हणून योगिता वानखेडे यांना विवरा वाघोदा गणातून रावेर पंचायत समितीच्या सदस्य पदाची संधी चालून आली.त्यात त्या जनतेच्या आशिर्वादाने विजयी झाल्या यामुळे त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची नामी संधी मिळाली पण जबाबदारीचे मोठे ओझे त्यांच्यावर आले,पण त्या खंबीर होत्या,अनेक राजकीय कुरघोडीना तोंड त्यांनी समर्थपणे दिलें, त्यातून मोठ्या दिमाखाने उभ्या आहेत.

नेहमीच बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या कल्याणासाठी नेहमीच झटत आहेत.त्यांनी रावेर तालुक्यातील गावागावांत बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानात मोठा खारीचा वाटा घेतला,ग्राऊंड लेव्हलवर काम तसेच रावेर तालुक्याच्या राजकारणात आपल्या कार्यतून वेगळी ओळख निर्माण केली.या लोकाभिमुख कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष गुलाबराव देवकर, जळगाव महापौर जयश्री महाजन, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रविण सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टीम झुंजार