
झुंजार । प्रतिनिधी रावेर
अनिल महाजन हे सर्व सामान्य कुटुंबातील जेमतेम परिस्थिती असलेला सुशिक्षित तरुण, मोलमजुरी करून आपला संसाराचा गाडा हाकणारा पण मनात काहीतरी वेगळंच करण्याची जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी होण्यासाठी रात्र दिवस धडपडत असणारा धगधगता अंगारा होय.
नितीमत्ता स्वच्छ, व्यवहार सचोटी प्रामाणिकपणा आणि दयाळू, करेल तेचं सांगेन, मराठी बाणा ही त्यांची मुलभूत आभूषणे. याच कार्यक्षमतेने आज अनिल भाऊ महाजन रावेर परिसरात केळी व्यापारी म्हणून वेगळीच छाप पाडत आहेत.यामुळे परिसरातील शेतकरी रोखचोख व्यवहाराने त्यांच्या कडे आकर्षित होतात व त्यांचा दररोज केळी सेल, टर्न ओव्हर जोमाने उंचावत आहे.केळीचा जास्त सेल भरपूर नफा यामुळेचं अनिल भाऊ महाजन हे केळी व्यावसायिक क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवून उभे आहेत,
आंनदी बाब म्हणजे ते समाधानी, प्रफुल्लित,नेहमीच हासरा चेहरा रोखठोक व्यक्तीमत्व , सर्वांना आपले मानणारे, आणि सर्वांना आपलेसे वाटणारे सुप्रसिद्ध विनम्र,शांत संयमी यांचा दुग्धशर्करा मनाने श्रीमंत असलेला माणसातील माणुसकी जोपासणारा निर्मळ झरा होय.हयाची पुण्याई म्हणून त्यांना युवा केळी व्यावसायिक हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.