झुंजार । प्रतिनिधी
आडगाव :- तालुका एरंडोल येथे कासोदा ते एरंडोल महामार्ग रस्त्यावरील आडगाव गावाला लागून असलेल्या प्लॉट एरियात दुपारी बारा वाजता आग लागली सदर आग ही साहेबराव हिरामण पाटील यांच्या मालकीचे प्लॉटमध्ये काही वर्षा पासून सांबा धना बारेला हे कुटुंबासोबत राहत होते
दुपारी त्यांच्या घरात अचानक आग लागली असता घरात लहान दोन मुली, एक मुलगा ,नातू असे होते सदर आग लागल्याचे लक्षात येताच लोकांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता त्या मुलांना त्यांचे घरातून बाहेर काढले यावेळी सांबा धना बारेला त्यांनी कष्ट करून संसार उभा केला होता
मात्र त्यांच्या या आगीत जीवित हानी पाच गाई ,दोन बोकड ,वीस ते तीस कोंबडी जळून खाक झाले तसेच घरातील अन्नधान्य कपडे ,शिलाई मशीन, टीव्ही ,एक नवीन मोटर सायकल( सीडी डीलक्स ) रोकड रुपये 60 ते 70 हजार रुपये जळून खाक झाले तसेच घराबाहेर असलेले 40 ते 45 हजार रुपये किमतीचा चारा देखील पूर्ण जळून गेला
संपूर्ण कुटुंब आज उघड्यावर येऊन गेले त्यांचे पूर्ण संसार या आगीत उद्ध्वस्त झाले तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या साहेबराव हिरामण पाटील, शिवराम खंडू महाजन ,शिवाजी लूकडू महाजन यांच्या गोठ्याला आग लागून प्रत्येकाचे चारा व 20 ते 25 पत्रे आगीत जळून गेले यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी व गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले
तसेच आग विजवण्यासाठी एरंडोल नगरपालिका व भडगाव नगरपालिका यांचे अग्निशामक बंब मागविण्यात आले व साधारणता दिड ते दोन तासात सदर आग विझवण्यात आली. यावेळी प्रशासनाकडून मंडळ अधिकारी अमोल शिंपी यांनी सदर घटनेचा पंचनामा केला