एकाच दिवशी 4 घरफोड्या 1 लाख 54 हजाराचा माल लंपास….

Spread the love

लोणार प्रतीनिधि /उध्दव आटोळे :- लोणार तालुक्यातील महारचिकना येथे एकाच रात्रीत चार घरफोड्या झाल्या आहे. चोरटे साधारण सकाळी 3 वाजेदरम्यान आले असावे असा अंदाज आहे. चोरटे यांनी घरी नसलेल्या घरी चोरी केली.त्यामध्ये संतोष कायंदे हे त्यांची आजी वारली असल्यामुळे ते चार ते पाच दिवसापासून देऊळगाव कोळ येथे गेले होते.त्याचबरोबर उध्दव ढाकणे हे आपल्या शेतात राहत असल्यामुळे त्यांच्या सुद्धा घरी कोणीच नव्हते.शिवगंगा बाई ढाकणे ह्या सुद्धा आपल्या घरी नव्हत्या त्यामुळे चोरट्यांनी संधी साधून रात्री संतोष कायंदे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी संदक दोन, बैक्सेट दोन उचलून शेजारील शेतात नेऊन सर्व सामान त्यामधील बाहेर काढले व त्यामधील काही सोने व रोख रक्कम व एक एल ई डी टीव्ही चोरुन नेली. त्याचबरोबर उध्दव ढाकणे यांच्या सुद्धा घरी कोणी नसल्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील

दरवाज्याची कडी तोडून संपूर्ण डब्बे खोलले व घरातील काही रोख रक्कम नेली,त्या मधील दोन कट्टे गव्हाचे चोरुन नेले.त्याच बरोबर शेजारील शिवगंगा बाई ढाकणे यांच्या सुद्धा घरी कोण नव्हते त्यांच्या घराच्या कुलूप तोडून घरातील जुना लोखंडी संदक चोरट्यांनी उचलून शेजारील शेतात नेऊन फोडला.तसेच शेजारील गजानन ढाकणे यांच्या घराचे आतील लॉक तोडून पर्स काढून नेली. त्यामध्ये सुद्धा रोख रक्कम होती.


चारही घरी चोरी करणारे चोर अंत्यंत हुशारीने कोणालाही संशय न येता चोरी केली.या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अज्ञात चोरट्या विरूद्ध पोलिस स्टेशन ला तक्रार दिली आहे.पुढील तपास ठाणेदार करीत आहे.

टीम झुंजार