आजपासून तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट?

Spread the love

जळगाव :- जळगाव जिल्ह्यात आज ४ मेपासून तीन दिवस पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. मागील गेल्या महिन्यापासून जळगावचा पारा वाढताच राहिल्याने कडक उन्हामुळे जळगावकर हैराण झाले आहे. जळगावात काल तापमानाची पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचला

यंदा मार्च महिन्यातच जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. तर एप्रिल महिन्यात त्यात वाढ होऊन तो ४६ अंशावर गेला. यंदा मे महिन्यात राहणारी उन्हाची तीव्रता एप्रिल (April) महिन्यातच दिसून आली. त्यामुळे मे महिना कसा जाईल याची चिंता आता जळगावकरांना लागली आहे.

सकाळपासूनच तापमानाचा पारा ४० अंशावर जात असल्याने कडक उन्हामुळे घामाच्या धारा वाहत आहेत. सकाळच्या वेळी रस्त्यावर वर्दळ दिसत असली तरी दुपारी मात्र रस्त्यावर अघोषित कर्फ्यु लागल्याचं चित्र पाहायला मिळते. रस्त्यावर शुकशुकाट असतो. गेल्या महिन्यात दोन ते तीन वेळा उष्णतेच्या लाटेचा सामना जळगावकरांना करावा लागला आहे. त्यात आता आजपासून ४ ते ६ मे अशी तीन दिवस पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.

  • जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान असे?

  • वेळ – अंश

    १२ वाजेला – ३७ अंश
    १ वाजेला- ३९ अंशापुढे
    २ वाजेला – ४० अंश
    ३ वाजेला – ४१ अंशापुढे
    ४ वाजेला – ४१ अंश
    ५ वाजेला – ४१ अंश
    ६ वाजेला – ४१ अंश
    ७ वाजेला – ३८ अंश
    आणि रात्री ८ वाजेला ३७ अंशावर स्थिरावणार.
टीम झुंजार