लोहारा (प्रतिनिधी ) :- येथील उपसरपंच विमालबाई हिरालाल जाधव यांनी गेल्या महिनाभरा पुर्वी त्यांचा ठरलेला कार्यकाळ संपल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता .या रिक्त पदा च्या निवडीसाठी आज दि. ५रोजी सरपंच अक्षय जैस्वाल यांचे अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजीत करण्यात आली होती .यात महाविकास आघाडीचे खंदे समर्थक व पत्रकार अशोक (आबा) शांतीलाल चौधरी यांची उपसरपंच म्हणुन निवड झालेली आहे .
सध्या येथील ग्रामपंचायती मध्ये महाविकास आघाडीचे अक्षय जैस्वाल यांची सत्ता आहे त्यांच्या गटा कडे १७ पैकी ९ सदस्य असल्याने बहुमत आहे. तर विरोधी गट कैलास चौधरी यांच्या गटा कडे ८ सदस्य आहेत. त्यामुळे यावेळी उपसरपंच निवड चुरशीची होईल असे वाटत होते. मात्र तसे प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत दिसुन आले नाही .
उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य दीपक रामदास खरे, संभाजी नामदेव चौधरी, शेख हसनलाल शेख साहेबलाल या तिघांनी कैलास चौधरी गटा कडुन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर अक्षय जैस्वाल गटा कडून एकमेव अशोक शांतीलाल चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता. या चार ही सदस्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवले होते. मात्र ,कैलास चौधरी गटाने ऐन वेळी निवडणूक प्रक्रिया अर्धवट सोडुन व दाखल उमेदवारी अर्जाची माघार देखील न घेता बहिष्कार टाकून निघुन गेल्याने शेवटी अशोक शांतीलाल चौधरी हे नऊ विरुद्ध शुन्य मतांनी उपसरपंचपदी विजयी झल्याचे निवडणुक अधिकारी सरपंच अक्षय जैस्वाल यांनी घोषीत केले . या निवड प्रक्रियेत १७ पैकी १६ सदस्यांनी सहभाग नोंदविला होता .तर ग्रामपंचायत सदस्या सौ.कल्पना राजेंद्र गीते या सदस्या गैरहजर राहिल्या होत्या. यावेळी सरपंच जैस्वाल यांना ग्रामविस्तार अधिकारी काळे यांनी सहकार्य केले .
उपसरपंच निवडी नंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला शेवटी सरपंच अक्षय जैस्वाल यांनी सर्वांचे आभार मानले.