सूरत :– लग्न म्हणजे नवरदेव-नवरी यांच्यासह दोघांच्या कुटुंबायीसाठी आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो. या आनंदाच्या दिवशी एका लग्नात एक दु:ख घटना घडली आहे. जसे आपण एखाद्या चित्रपट मालिकेत पाहतो तसाच काहीचा प्रसंग उपस्थित लोकांनी जिवंतपणे अनुभवीला स्वत:च्याच लग्नात नवरदेवाचा वरातीत नाचताना हृदयविकाच्या झटका येऊन मृत्यू झाला आणि सुरांच्या ऐवजी एकच आक्रोश कानी पडला. ही हृदयद्रावक घटना घडली सुरतमध्ये.
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात वरात निघण्यापूर्वी मित्रांसोबत डीजेवर नाचत असताना नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांना लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ त्यास रुग्णालयात घेऊन गेले मात्र तोपर्यंत खूप उशीर होऊन गेला होता. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. ही घटना सूरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावातील आहे.
मितेश भाई चौधरी, वय 33 असे नवरदेवाचे नाव असून यांची वरात बालोद तालुक्यातील धामंडळा गावात जाणार होती. वरात निघण्यापूर्वी काही विधी पूर्ण करण्यात आले. त्यानंतर वरात निघणार होती. आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेवर नाचत होते. मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही नाचण्याची इच्छा झाली आणि तोही डीजेजवळ पोहोचला. दरम्यान, नाचत असलेल्या मितेशला त्याच्या मित्रांनी खांद्यावर उचलून घेतलं आणि नाचायला सुरुवात केली. त्यानंतर अचानक मितेशच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर लगेच कुटुंबीयांनी तात्काळ मितेशला मोटरसायकलवर बसवून स्थानिक रुग्णालय गाठलं.
मात्र येथील डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्याला रुग्णवाहिकेतून बारडोली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.