एरंडोल पोलिस स्टेशनतर्फे सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी सात मे रोजी स्वाक्षरी मोहीम.

Spread the love

एरंडोल :- समाजामध्ये शांतता प्रस्थापित राहावी या उद्देशाने जिल्हा पोलिस दल, जळगांव अंतर्गत एरंडोल पोलिस स्टेशनतर्फे दि. ७ मे रोजी सकाळी ११ वाजता शहरातील नथू बाप्पू दर्गा एरंडोल येथे ठेवण्यात आलेला असून. सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी “स्वाक्षरी मोहीम” आयोजित करण्यात आली आहे.

“आरती असो वा अजान, एकात्मतेतंच “ सर्वांचे कल्याण” असा या स्वाक्षरी मोहिमेतुन संदेश सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम एरंडोल पोलिस स्टेशनतर्फे करण्यात येणार आहे.

या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन एरंडोल पोलिस निरीक्षक सह सर्व पोलिस अधिकारी / कर्मचारी यांनी केले.

टीम झुंजार