
पारोळा :- पारोळा नागपूरहून सुरतकडे काच घेऊन ट्रकचालक जाणारा लघुशंकेसाठी थांबला असता, तीन जणांनी त्याला मारहाण केली व त्याच्याकडील १५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पारोळ्यानजीक घडली.
याप्रकरणी एकाला दोन तासातच चोरट्याला. अटक करण्यात आली आहे. अशोक केशवराव देशमुख (रा. नागपूर) असे या ट्रकचालकाचे, तर अमोल दत्तू होता. पाटील (रा. तलाठी कॉलनी,पारोळा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

देशमुख हा नागपूर येथून काच भरून ट्रक घेऊन सुरतकडे निघाला पारोळ्यानजीक तो लघुशंकेसाठी थांबला होता. त्याचवेळीतीन चोरट्यांनी त्यास पकडून रोडच्या बाजूला ओढत नेऊन मारहाण केली. तसेच त्याच्याकडील मोबाईलसह १५५०० रुपये किमतीचा मुद्देमाल काढून घेतला.
- पोलिसांना सांगितली आपबीती.
ट्रक चालकाने थेट पारोळा पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक रामदास याकोडे यांना आपबीती सागितली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड, रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, सहाय्यक फौजदार जयवंत पवार, हे, काँ, विनोद साळी, पो.ना. सुनील साळुंके, संदीप सातपुते, प्रवीण पाटील, राहुल पाटील, अभिजित पाटील, महेंद्र साबे, किशोर भोई, राहुल पाटील यांच्या पथकाने आरोपी अमोल पाटील यास तलाठी कॉलनीतून अटक केली. त्याने आपल्यासोबत आणखी दोन साथीदार असल्याचे सांगितले. या दोन जणांचा शोध सुरू आहे. पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व त्यांच्या पथकाने २ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.