
लोणार प्रतीनिधि/उध्दव आटोळे :- लोणार तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण म्हणून ओळख असलेल्या वेणी ग्रामसेवा सोसायटी अध्यक्षपदी राजाभाऊ तांबीले यांची तर उपाध्यक्षपदी दिपक साखरे यांची अविरोध निवड करण्यात आली.
आज दिनांक 6 मे 2022 रोजी वेणी ग्रामसेवा सोसायटीची निवडणूक सहाय्यक उपनिबंधक कार्यालय,लोणार येथे आयोजित करण्यात आली होती या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी राजाभाऊ तांबिले यांचा तर उपाध्यक्षपदासाठी दिपक साखरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यावेळी लेखापरीक्षक सहकारी संस्था लोणार पी.यु.पांडे, आर.पी.खारटे सहकार, आधिकारी एस.व्ही राठोड, संस्थेचे सचिव विजय चनखोरे यांनी दोघांची अनुक्रमे अध्यक्ष उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहीर केली.

यावेळी ग्रामसेवा सोसायटीचे नवनियुक्त संचालकांचा सत्कार जिल्हा प्रमुख बळीराम मापारी,माजी उपसभापती केशवराव फुके,माजी पंचायत समिती सदस्य मनोज तांबिले,गजानन काकडे,विठ्ठल गिलवरकर,पोलीस पाटील राजु शेवाळे,प्रविण देशमुख,राजु दळवी,संतोष खोतकर,दत्ता देसाई,राम जावळे गावचे सरपंच अभिमन्यू साखरे व उपसंरपच विष्णू जावळे यांनी नवनियुक्त अध्यक्ष,उपाध्यक्ष व इतर सदस्यांचा सत्कार केला व अभिनंदन केले, यावेळी मनोजभाऊ तांबिले,बाबुराव हुले,रमेश इंगळे,सरस्वती सरकटे,शेख जिल्लानी शेख चांद,हरीशचद्र गाडेकर,पुष्पा जावळे,गजानन अंभोरे,अशोक हरदाळकर,किसन डव्हळे, गजानन जटाळे नवनिर्वाचित सदस्य हजर होते.