एरंडोल प्रतिनिधी:-2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. त्या प्रित्यर्थ एरंडोल पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेमार्फत एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांना आज सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. कोरोना काळात एरंडोल शहर व तालुक्यात अत्यंत प्रभावी जबाबदारी पार पाडल्याबद्दल सदर सन्मानपत्र संघटनेमार्फत देण्यात आले. एरंडोल शहरातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शालीग्राम दादा गायकवाड सदर प्रसंगी उपस्थित होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ, उपक्रम विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज नन्नवरे, डी. डी. एस पी कॉलेज, एरंडोल चे पर्यवेक्षक प्रा. नरेंद्र गायकवाड संघटनेचे सचिव प्रकाश तामस्वरे व चिंतामण जाधव सर उपस्थित होते. समता शिक्षक परिषदेमार्फत गौरव झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर जाधव यांनी आभार व्यक्त केले.
Home ताज्या बातम्या पोलीस दल स्थापना दिना प्रित्यर्थ पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर जाधव व एरंडोल...