पारोळा बायपास दरोडा प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

Spread the love
संशयित आरोपी भुया उर्फ नाजीमखाँ मुख्तारखाँ कुरेशी व लखन रमेश गायकवाड

पारोळा :- येथील राष्ट्रीय महामार्गावर ५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दोन ट्रक चालकांना मारहाण करून रोख रक्कम व मोबाइल चोरीच्या घटना घडल्या होत्या. यातील एक गुन्हा ६ तर दुसरा गुन्हा ७ तारखेला दाखल झाला होता. या दोन्ही घटनेतील एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

करंजी येथील दीपक भिला पाटील हे ट्रक (एमएच १८ बीजी ००३२) ने २ रोजी बडोदा येथून ठिबकच्या नळ्या घेऊन ४ रोजी पारोळ्याला आले. अक्षय तृतीयेनिमित्त ते आपल्या गावी रात्री मुक्कामी राहिले. त्यानंतर हा माल खामगाव पोहोच करण्यासाठी जात असताना पारोळा शहरालगत बायपासवर रात्री २.३० वाजता एक महिला व एक पुरुषाने त्यांच्या गाडीला हात दिला. गाडीचा वेग कमी करताच क्लिनर साईडने एका तरुणाने गाडीत घुसून मारहाण करत दीपक पाटील यांच्या खिशातील रोख ५ हजार व ८ हजारांचा मोबाइल हिसकावून पारोळा शहराकडे पळ काढला होता. या प्रकरणी एका पहिलेच अटक झाली आहे.

  • पारोळा पोलिस पथकाने मोठे यश .

दरम्यान, ट्रक लुटीतील दुसरा व तिसरा आरोपी जाळ्यात घेऊन पारोळा पोलिसांच्या पथकाने मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात दुसरा संशयित भुया उर्फ नाजीमखाँ मुख्तारखाँ कुरेशी यास अमळनेर बायपास वर तर तिसरा संशयित लखन रमेश गायकवाड यास पारोळ्यातून ताब्यात घेतले आहे. पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक जाधव, एएसआय जयवंत पाटील, पोलिस नाईक सुनील साळुंखे, संदीप सातपुते, कॉन्स्टेबल राहुल कोळी, किशोर भोई, अभिजीत पाटील, महेंद्र साडे, राहुल पाटील यांनी दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

टीम झुंजार