लाचलुचपत विभागाने सापळा रचून ११ हजाराची लाच घेतांना ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.

Spread the love

चोपडा :- गटार ढापे बांधण्याचे कामाचे बिल पास करण्यासाठी ११ हजाराची लाच घेतांना चोपडा तालुक्यातील वर्डी गावातील ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

कारवाईने उडाली खळबळ


याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी १५ व्या वित्त आयोगांतर्गत निधीतून गटार व ढापे बांधण्याचे काम पुर्ण केले. दरम्यान कामाचे बिल अदा होण्यासाठी चोपडा तालुक्यातील वर्डी येथील ग्रामविकास अधिकारी भगवान पांडूरंग यहीदे (रा. बोरवले नगर, चोपडा) यांनी १२ हजाराची लाच मागितली तडजोडी अंती ११ हजाराची रक्कमेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून ११ हजाराची लाच घेतांना ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.

यांनी केला सापळा यशस्वी


ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजित चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा,मोरे , सुधीर मोरे यांनी केली.

टीम झुंजार