जळगाव :- जळगाव शहरातील गोलाणी मार्केटच्या टेरेसवरून खाली पडल्याने तरूण जागीच मृत्यू झाला. मुकेश रमेश राजपूत (वय-३२) रा. नाथवाडा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव असून ही घटना रात्री रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडलीय. याप्रकरणी शहर पोलीसात अकस्तात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
मुकेश राजपूत हा गोलाणी मार्कट येथील खाऊगल्लीत चायनिज दुकानावर कामाला होता. सोमवार ९ मे रोजी सायंकाळी गोलाणी मार्केट येथील खाऊ गल्लीत कामावर आला होता. रात्री काम आटोपून घरी निघून गेला. दरम्यान, रात्री १२.३० वाजता तो गोलाणी मार्केटच्या छतावरून खाली पडल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला.
कामावरून घरी गेलेला मुकेश गोलाणी मार्केटमध्ये रात्री उशीरा काय करत होता याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मंगळवारी १० मे रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.