नाशिक,(प्रतिनिधी) : – नाशिक येथील येवला रस्त्यावर अनकवाडे शिवारात चारचाकी वाहन झाडावर आदळून मोठा दुर्देवी अपघात झाला या अपघातात मित्र असलेले चार तरुण जागीच ठार झाल्याची घटना समोर आली असून गाडीत असलेला पाचवा मित्र देखील गंभीर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.
मृत्यू झालेल्या तरुणांची नावं….
अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे चौघे जागीच ठार झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पूर्णतः चुराडा झाला आहे.
तर गाडीमधील पाचवा प्रवासी असणारा अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे. अजयवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार आहेत.मात्र अजयची प्रकृती पाहून त्याला सकाळच्या सुमारास पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.