शिवा संघटनेच्या वतीने लोणार शहरात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

Spread the love

लोणार प्रतिनिधी/उध्दव आटोळ :- लोणार शहरात शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची 891 वी जयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभयात्रे मध्ये स्त्री-पुरुष,अबाल-वृद्धाचा समावेश होता.शोभायात्रा ही स्थानिक श्रीराम मंदिरा पासुन सुरुवात होऊन जामा मस्जिद चौक,बस स्टैंड चौक,मापारी गल्ली, जैन मंदिर, डोंगरवाल चौक, प्रताप चौक येथे येऊन गेलड़ा भवन मध्ये प्रतिमेचे पुजन करून समारोप करण्यात आला. त्यांनतर महाप्रसाद वितरण करण्यात आला.


महात्मा बसवेश्वर यांचे उल्लेखनीय कार्य 12 व्या शतकात केले असुन ते वीरशैव लिंगायत धर्म प्रचारक व प्रसारक होते. जगातील पहिल्या लोकशाहीचे प्रणेते म्हणुन त्यांना संबोधले जाते. अनुभवमंटप नावाची संसद त्यांनी त्या कठीन काळात निर्माण करून त्यात स्त्री पुरुषाना समान अधिकार दिले यात त्यांनी 700 शरण आणि 70 शरणी चा समावेश होता. महात्मा बसवेश्वर यांनी जातिपातीला थारा न देता सर्वाना एका छताखाली आणण्याचे काम केले. कर्म हेच दैव असे म्हणत त्यांनी श्रमाला महत्व दिले.

जातिभेद वर्णभेद नष्ट करून त्यांनी आंतरजातीय व विद्वा विवाह त्या कठीन काळात विरोध असताना घडून आणले. महात्मा बसवेश्वर हे वीरशैव कुळात जन्मले असुन कर्नाटक राज्यातील बिजापुर जिल्ह्यातील बागेवाड़ी या गावात त्यांचा अक्षय्य तृतीया इ.स.1131 मध्ये जन्म झाला. अश्या महान क्रांतिकारी महामानवाच्या कार्याची प्रेरणा अनेक देशांनी घेऊन त्यांचा गुणगौरव केला आहे अश्या या महान विभुतिच्या जयंती निमित्त लोणार शिवा संघटनेच्या वतीने श्री गणपत आप्पा खडक्कर, मंगेश शेटे सर, ओंकार आप्पा खुपसे सर यांच्या मार्गदर्शनाने अक्षय शेटे, योगेश भुक्कन, आकाश आपटे,विनायक खडक्कर, गोविंद खुपसे, कमलेश शेटे, शुभम बेंद्रे, सुहास शेटे, शिवलिंग मिटकरी, सागर शेटे, अमोल मुलंगे, श्रीकांत शेटे या तरुणांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यांच्या बरोबर असंख्य समाजबांधव या शोभायात्रेला उपस्थित होते. यावेळी पोलिस बांधवाचे विशेष सहकार्य केल्यामुळे शिवा संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले..


पोलिसांनी केले तोंड भरून कौतुक

शिवा संघटेने अगदी शिस्तब्ध आणि वाहतुक विस्कळीत होणार नाही याची स्वतःहूंन दक्षता घेतली आणि अशी ही पहिली शोभायात्रा बघितली की ज्यात शोभयात्रेतील तरुणांने पाणी वाटपाच्या ठिकांणचे सर्व ग्लास गोळा करून स्वछता राखली आणि सर्वात शेवटी आमचे पोलिस बाधवांचे आभार माणून महाप्रसाद देन्यात आला असे कधीच दिसुन आले नाही, यामुळे पोलिस बांधवानकडून तोंड भरून शिवा संघटना व वीरशैव लिंगायत समाजाचे कौतुक केले.

टीम झुंजार