झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
जंक्शन : (ता. इंदापूर ) पाणी प्रश्नासंदर्भात 46 फाट्या मधून शेतकऱ्यांना जनावरांना शेतीसाठी पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे याकरिता नाना साळुंखे यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे आमरण उपोषण आंदोलन धरले होते
यावेळेस आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकाळी आठ पासूनच संतोष कांबळे सचिव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य तथा प्रभारी भाजपा बारामती लोकसभा मतदारसंघ तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे इंदापूर तालुका अध्यक्ष सतीश भोसले यांनी उपोषणस्थळी सकाळपासून उपस्थित राहून नाना साळुंखे यांना पाठिंबा दिला
यावेळेस जंक्शन पंचक्रोशीतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी वसंत आबा मोहोळकर उद्धव माने सुधाकर कणसे ऋषिकेश मोहोळकर विजय बनसोडे संभाजी बनसोडे सामाजिक कार्यकर्ते विशाल बनसोडे विजय चितारे भीमशक्ती संघटना अण्णा भोसले इत्यादी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन आपला पाठिंबा दर्शविला यानंतर सकाळी 11 वाजता अंथुणै मंडळाचे पाटबंधारे खात्याचे मुख्य अधिकारी यांनी उपोषणस्थळी येऊन पाणी सोडण्याचे आश्वासन दिले
यावेळेस वालचंद नगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी माननीय श्री बीराप्पा लातुरे साहेब उपस्थित होते आज रात्री 46 फाट्या मधून पाणी सोडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला होता यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे याबद्दल पंचक्रोशी मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळीभाजपा नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांनी नाना साळुंखे कोषाध्यक्ष भाजपा इंदापूर तालुका यांना मोबाईल वरती बोलून आपला पाठिंबा व्यक्त केला.