
झुंजार । प्रतिनिधी
पारोळा – तालुक्यातील भोलाणे विविध कार्यकारी सोसायटीची निवणडुक १२ मे रोजी पार पडली. या निवडणुकीत १३ जागेसाठी मतदान प्रक्रीया घेण्यात आली. १३ अर्जांच्या विरोधात एकही अर्ज प्राप्त न झाल्याने भोलाणे विकासोवर शिवसेनेने १३ पैकी १३ जागांवर बिनविरोध विजय मिळवत भगवा फडकविला आहे.
दामोदर नथ्थु पाटील, पांडुरंग कौतिक पाटील, ईश्वर बंकट पाटील, शालिक आणा पाटील, राजेंद्र देवराम पाटील, भगवान सहादु पाटील, प्रकाश अभिमन पाटील, भगवान महादु पाटील, शोभाबाई सुभाष पाटील, विमलबाई सुरेश न्हावी, शोभेसिंग बाळु जाधव, अशोक रामा भिल, लक्ष्मण लाला हाटकर अशी विजयी उमेदवारांची नावे आहे.
या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा देत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बाजार समिती मा.संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, यशवंत दला पाटील, गिरधर बोमडु पाटील, निंबा यशवंत पाटील, युवराज काशिनाथ पाटील, दिनकर मन्साराम पाटील, आत्माराम यादव पाटील, अजयकुमार निंबा पाटील, निखिल देवेंद्र बोरसे, भगवान विठ्ठल पाटील यांचेसह आदी उपस्थित होते.
