झुंजार । प्रतिनिधी एरंडोल
एरंडोल :- शेतीच्या वादावरुन काका पुतण्यांमध्ये वाद झाल्याने त्याचे पर्यावसण हाणामारी होऊन एका 28 वर्षीय युवा अभियंत्याच्या मृत्यू झाला.
याबाबत काका-काकू दोन चुलत भाऊ यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
दिनांक १२/०५/२०२२ रोजी सकाळी ०६.३० ते ०७.०० वाजेचे दरम्यान सुनीता महाजन त्याचे पती, मुलगा निलेश, उमेश असे शेतीकामासाठी शेतात जाण्यासाठी निघालो. त्यावेळेस आम्ही जुप म्हणून वर्षभरास कसण्यास मिळालेल्या सासुबाईना तोड़ी दिलेल्या सामाईक हिस्सावरील शेताजवळ पोहोचलो. त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचे जेठ तुकाराम महाजन, जेठाणी उषाबाई महाजन, पुतण्या मनोज महाजन, मोठे जेठ सुरेश महाजन, पुतण्या अनिल महाजन असे आले त्यावेळेस तुकाराम महाजन व मनोज तुकाराम महाजन यांचे हातात लाकडी दांडके होते व जेठाणी उषाबाई हीचे हातात खुरपणे होते.
त्यावेळेस जेट तुकाराम याने तुम्ही शेतात पाय ठेवायचा नाही व शेत जुप करण्यासाठी मागायची नाही असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने मोठा मुलगा उमेश त्यांना समजावून सांगत असतांना तुकाराम महाजन, मनोज महाजन यांनी त्यांचे हातातील दांडके उमेश वर उगारले त्यावेळी माझा लहान मुलगा निलेश याने मनोज याचे हातातील दांडके हवेत धरण्याचा प्रयत्न करतांना त्या दांडक्याचा मार निलेशला लागला तसेच तुकाराम याने त्याचे हातातील दांडके उमेशला मारले. त्यावेळेस उषाबाई होच्या हातातील खुरपे घेवून मागुन धावत आली व याला जास्त झाले आहे.
याला जिवंत सोडू नका असे बोलू लागली. सदर वेळी सुरेश महाजन, अनिल महाजन यांनी उमेशला जमिनीवर खाली पाडून तुकाराम, मनोज, सुरेश, अनिल अशा चौघांनी लाथाबुक्यांनी उमेश यास पोटावर, गुप्तभागावर जोरजोरात मारहाण करीत असतांना सुनीता महाजन तसेच पती आबा महाजन, मुलगा निलेश अशांनी उमेशला त्यांचे तावडीतून सोडवत असतांना उषाबाई हीने माझे केस धरुन मला जमिनीवर खाली पाडुन मला लाथाबुक्यांनी व उलट्या खुरप्याने मारहाण केली. वरील सर्वजण आम्हास मारहाण करत असतांना त्यावेळी शेतात जाणारे आमच्या गावातील युवराज भाऊलाल महाजन, योगेश युवराज देवरे, रवी फुलारी व त्याची पत्नी यांनी आम्हास होणारी मारहाण पाहून आमचेकडे धावत येवून त्यांचे ताब्यातून आंम्हाला सोडविले. त्यावेळी गर्दी जमा होत असल्याचे पाहून वरील सर्वजण तेथून पळून गेले.
मारहाणीत उमेशला मार लागुन त्याचे पोट दुखुन खुप त्रास होत असल्याने आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आलो असता उमेशला त्रास होत असल्याने पोलीसांनी वैद्यकीय मेमो देवुन त्यास उपचारासाठी ग्रामिण रुग्णालय एरंडोल येथे नेण्यास सांगितल्याने आम्ही त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे दाखल करुन मी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.परंतु मुलगा उमेश यास जास्त त्रास होवु लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल जळगांव येथे नेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला त्यावरुन माजी नगरसेवक योगेश महाजन व त्याच्यापरिवारातील सदस्यानी त्यास १०८ अॅम्ब्युलन्सने जळगांव येथे नेवुन उपचारासाठी दाखल केले. सिव्हील हॉस्पीटल जळगांव येथे उमेश याचेवर उपचार सुरु असतांना उपचारा दरम्यान सायंकाळी ०५.०० वा. तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
रात्री उशिर झाल्यामुळे शवविच्छेदन झाले नाही.दि 13 मे रोजी दुपारी 12 वाजता मयत उमेश यावर शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी 2 वाजेच्या सुमारास प्रचंड जनसमुदा समक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत उमेश याचे मागील वर्षी 6 जून 2021 रोजी लग्न झाले होते. उमेश हा सोफ्टवेअर इंजिनीअर होता व तो औरंगाबाद येथे खाजगी कंपनीत नोकरीस होता.
या बाबत मयत उमेश ची आई सुनिता आबा महाजन,यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात संशयित 1)जेठ तुकाराम भगवान महाजन,2) जेठाणी उषाबाई तुकाराम महाजन, 3)पुतण्या मनोज तुकाराम महाजन, रा. मारुती मढी, एरंडोल,4)मोठेजेठ सुरेश भगवान महाजन, 5)पुतण्या अनिल सुरेश महाजन, रा. रवंजे, ता. एरंडोल यांचे विरुद्ध 302,324,323,147,504,506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
नऊ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न, पत्नी गर्भवती
उमेशचे अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्यात झाले होते. तो सध्या औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीला होता. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सुटी घेऊन तो गावी आला होता. नऊ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले असून, पत्नी मयूरी ही गर्भवती आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.