झुंजार । प्रतिनिधी धरणगाव :- तालुक्यातील पथराड येथे दिनांक 13 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास राजेंद्र ज्ञानदेव शिंदे वय 52 वर्ष या शेतकऱ्याने कर्जबाजारी ला कंटाळून शेतातच कीटकनाशक औषधी पिऊन आत्महत्या केली.
राजेंद्र शिंदे यांना त्यांचा मुलगा दीपक याने रात्री आठ वाजता फोन केला की पप्पा जेवणाला घरी या तुम्ही कुठे आहात राजेंद्र शिंदे यांनी मुलास सांगितले की मी शेतात आहे आणि मी औषधी घेतली आहे त्यामुळे मी मी घरी येणार नाही मुलाने एवढं ऐकताच लगेच शेत गाठले त्यावेळेस राजेंद्र शिंदे जमिनीवर पडलेले होते मुलाने औषधी पिल्याची खात्री करून लगेच नातेवाईकांना फोन करून शेतात बोलावले व ताबडतोब जळगाव जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले.
रात्री दोन वाजता औषध उपचार करत असताना राजेंद्र शिंदेचा मृत्यू झाला. राजेंद्र शिंदे यांच्यावर विकास सोसायटीचे 2013 पासून कर्ज थकीत होते दरवर्षी नापिकी अतिवृष्टी मुळे हातात काहीच येत नसल्याने संतापाच्या भरात विष पिऊन आत्महत्या केली. तत्पश्चात पत्नी मुलगा-सून व तीन मुली तसेच पाच भाऊ . माजी सरपंच शरद शिंदे यांचे मोठे बंधू होत.