झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथे दिनांक १२/५/२२ रोजी सकाळी शेतीच्या वादावरून एका २८ वर्षीय उमेश आबा महाजन या युवा अभियंत्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन काका, काकू, दोन चुलत भाऊ अश्या पाचही संशयितच्या विरोधात दि.१३/५/२२ रोजी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्या तदनंतर
आज दि 14 मे रोजी संशयित आरोपी तुकाराम भगवान महाजन, मनोज तुकाराम महाजन, सुरेश भगवान महाजन , व अनिल सुरेश महाजन यांना एरंडोल येथील मे. न्यायालयासमोर हजर केले असता मे.न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी आरोपितांना ४ दिवस पोलिस कोठडी सुनावली.
संशयित आरोपितांकडून ॲड.अजयकुमार सिसोदिया, ॲड.अजिंक्य ए काळे ,व ॲड.अक्षय डी चोपडा कामकाज बघत आहेत तर सरकारी पक्षाकडून ॲड. अनिल पाटील कामकाज बघत आहेत .